अमळनेरात रजनी प्रतिष्ठान तर्फे वृक्ष लागवड…
अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथे संत सखाराम नगर येथे रजनी प्रतिष्ठांन संस्थेच्या हिरकण ताई सदांशिव यांच्या मार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी पर्यावरणासाठी झाडा चे महत्व समजविण्यात आले तसेच पर्यावरणावर काम करणाऱ्या सर्व महिलांचा सत्कार हिरकण ताई संदानशिव यांनी केला.संस्थे मार्फत ५०० रोपे वाटप करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा चेतना वाल्मिक कापडणे यांनी पर्यावरणाचे महत्व सांगताना झाडाचे महत्व सांगितले , संस्थेच्या महिला मंडळाच्या पुढाकाराने वृक्ष रोपन करण्यात आले. वृक्ष रोपण प्रसंगी संस्थेच्या हिरकन ताई संदानशिव,वैशाली पाटील, पुष्पा बोधरे, अल्पना कुलकर्णी, मनीषा चौधरी,सुनीता पाटील,गायत्री पाटील, यामिनी मक वा ना, अरुणा गोसावी, मनीषा चौधरी, वंदना मोरे, प्रतिभा माळी, रंजना गायकवड, योगिता पाटील, सुजाता दुसाने, सोनाली चौधरी, कल्याणी चौधरी, सुरेखा आमोदे ,आदी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.