शिक्षण
अण्णासाहेब मगर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचा समारोप समारंभ संपन्न..
पुणे (हडपसर) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १८ डिसेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर घेण्यात आले.
या शिबिराचा समारोप प्रसंगी गावच्या प्रथम नागरिक सौ कमलताई कोकडे सरपंच न्हावरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे तथा व्यवस्थापन परिषद सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब काळे, माजी मुख्याध्यापक रंगनाथ गायकवाड, मल्लिकार्जुन विद्यालयाचे मुख्याध्यापक सानप तसेच पर्यवेक्षक जाधव सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागताने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. सविता कुलकर्णी यांनी गेल्या सात दिवसांच्या कामांचा आढावा घेतला.
यामध्ये मल्लिकार्जुन विद्यालय येथे वृक्षारोपण, उरळगाव, संगम बेट, न्हावरे गाव परिसर येथे स्वच्छता, स्पर्धा , सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा याविषयीची माहिती त्यांनी दिली. तसेच मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे या ठिकाणी घेतलेल्या ज्ञानसेतू, ध्यान व प्राणायाम उपक्रम, अन्न भेसळ माहिती व प्रात्यक्षिक या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिबिरामधील आवडलेल्या गोष्टी, उपक्रम याची माहिती दिली.
यावेळी गौरी मसुरकर, कुणाल खंडागळे, पायल सोनवणे, साहिल सय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नाना शिंदे, चंदू मामा साठे तसेच उत्कृष्ट विद्यार्थी स्वयंसेवक ओम लटके व पायल सोनवणे व उत्कृष्ट गट यांना सन्मानित करण्यात आले. यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना सन्माननीय सरपंच सौ कमलताई कोकडे यांनी गावांमध्ये शिबिर घेतल्याचा आनंद व्यक्त केला. या शिबिरामुळे गावकऱ्यांनाही एक वेगळी उर्जा मिळाली. यातून प्लास्टिक संकलन यासारखे उपक्रम गावांमध्ये सुरू करू असे मत त्यांनी व्यक्त केले. तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य रंगनाथ गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे संवाद साधताना गेल्या सात दिवसाचा आढावा घेतला व अतिशय शिस्तप्रिय वातावरणात विद्यार्थ्यांनी सगळ्या उपक्रमात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचा या ठिकाणी असणारे शिबिर सर्व ग्रामस्थांसाठी अतिशय आनंदाचा भाग होता असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सात दिवसात घेतलेल्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी शिकता येतात मग ते स्पर्धा असोत श्रमदान असो किंवा शाळेमध्ये घेतलेल्या घेतलेले उपक्रम असोत. यातून विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख होते. आपल्यामध्ये कोणते गुण आहेत हे माहीत होते. त्यामुळे अशी शिबिरे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विवेकानंद टाकळीकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. गणेश आवटे यांनी केले. या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. परिसरात असलेल्या झाडांसाठी क्यूआर कोड तयार करण्यात आलेले होते. त्याचेही अनावरण माननीय प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे व मा. सरपंच सौ कमलताई कोकडे व उपस्थिताच्या शुभहस्ते करण्यात आले.
या शिबीराचे नियोजन डॉ सविता कुलकर्णी, डॉ गणेश आवटे, प्रा. विवेकानंद टाकळीकर, प्रा. अपूर्वा बनकर, प्रा. अर्चना श्रीचप्पा, प्रा. नवनाथ गाढवे, नाना शिंदे, चंद्रकांत साठे, अक्षय कोकरे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
“द पाॅईंट न्युज 24” – https://d9news.in/
फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
डेली हंट – https://profile.dailyhunt.in/sunil24
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
वाॅटसअप – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj
वर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.